गणेशोत्सवासाठी टोल फ्री कोकणप्रवास


मुंबई । गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या भक्तांची संख्या मोठी आहे. आजही कित्येक चाकरमनी गणेशोत्सवात आपलं बस्तान कोकणात मांडतात. अशाच कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. तुमचा कोकणपर्यंतचा प्रवास आता टोल फ्री करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना 11 ते 14 सप्टेंबर टोल फ्री प्रवास करता येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 11 ते 14 सप्टेंबरपर्यंत टोल फ्री प्रवास करता येणार आहे. कोल्हापूर मार्गे जर तुम्ही कोकणात जात असाल तर हा टोल फ्री प्रवास करता येईल. तसेच, परतीचा प्रवासही टोल फ्री करण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांनी वर्तविली आहे. त्यामुळे यंदा टोलचे विघ्न दूर झाल्याने चाकरमनी भलतेच खूश आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी केली होती. गणपती उत्सवाच्या काळात येणार्‍या चाकरमान्यांचा व वाहतूक खेळखंडोबा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश त्यांनी बांधकाम अधिकार्‍यांना दिले होते.

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा