राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील दोन दिवस कोठडीतच काढावे लागणार आहेत. न्यायालयात निकालाचं वाचन पूर्ण न झाल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार असून निर्णय देण्यात येणार आहे. वेळे अभावी न्यायालयाला आज निर्णय देता आला नाही. तसेच उद्या ईदमुळे न्यालयाच्या कामकाजाला सुट्टी आहे. त्यामुळे पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून रवी राणा तळोजा कारागृहात तर नवनीत राणा अर्थररोड कारागृहात आहेत. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयात अंतिम निर्णयाचे वाचन सुरु होते. परंतु कामकाजाची वेळ संपल्यामुळे निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे पुढील २ दिवस राणा दाम्पत्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा