कोकणात जाणार्‍यांनो सुरक्षित प्रवासासाठी "या" मार्गांचा करा वापर

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन राज्य महामार्ग पोलिसांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरून कोल्हापूरमार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात जाणार्‍या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली - वाकण मार्गाचा वापर करावा. रत्नागिरी व सिंधुदुर्गात जाणार्‍या वाहनचालकांनी चिपळूणला जाणार्‍यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळूण रस्त्याचा वापर करावा. हातखंबा येथे जाणार्‍यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप- मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा - राजापूर मार्गावरून जावे, असेही ते म्हणाले.
कणकवलीला जाणार्‍यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी - कणकवली गाठावे. मुंबईहून सावंतवाडीला जाणार्‍या कोकणवासीयांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा- कराड-कोल्हापूर-निपाणी- आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जावे. गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी महामार्ग पोलीसांनी उपाय योजना केल्या असून, ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसेच इतर माहितीसाठी महामार्ग पोलिसांची ुुु.हळसहुरूिेश्रळलश.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक9833498334 व 9867598675 येथे संपर्क साधावा. तसेच 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संदेश पाठविता येईल, असे महामार्ग पोलिसांनी कळविल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा