गणपती स्पशेल गाड्यांना दिव्यात मिळणार थांबा, वाचा कोणत्या गाड्या थांबणार दिव्यात
ठाणे । गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्या चाकरमन्यांची संख्या वाढते आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात दिव्यातीलही संख्या वाढलीय. मात्र दिवेकरांना कोकणात जाण्यासाठी ठाणे, दादर किंवा सीएसटी येथून प्रवास करावा ट्रेन पकडाव्या लागतात . त्यामुळे गणपती स्पेशल गाड्या दिव्यात थांबाव्यात अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत असताना यंदापासून गणपती स्पेशल गाड्यांना दिव्यात थांबा मिळणार आहे. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे या गाड्यांना दिव्यात थांबा मिळणार आहे.
कोकणात जाणार्या गणपती स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा याकरिता दिवा रेल्वे प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होती. मागील दोन वर्षांपासून एक नाममात्र स्पेशल गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला जात होता. कोकणात जाणार्या स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा असे पत्र 16 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले होते.
परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून दिवेकर रेल्वे प्रवासी शनिवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी दिवा स्थानकातून काळ्या फिती लावून प्रवास करतील असे पत्र प्रवासी संघटनेतर्फे देण्यात आले. त्या निषेध आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रविवारी सकाळी काही नवीन गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेऊन त्या गाड्या थांबल्याही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई- रत्नागिरी (01033), लोकमान्य टिळक टर्मिनन्स- झारप (01039/01040), सावंतवाडी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई(01036) या गाड्यांना दिव्यात थांबा मिळणार असल्याने दिव्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment