राजापूरच्या वाकेडघाटीत अपघातात ५ जणांचा मृत्यू

राजापूर । मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. त्यात दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमूरड्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत.
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळच्या वाकेडघाटीत मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी गाडी आणि गोव्याकडे जाणार्‍या इको कार ट्रॅव्हलची समोरासमोर टक्कर झाली. त्यात इको कारचा चेंदामेंदा झाला असून या कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत अाहे. अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत. मात्र आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा