राम कदम पुन्हा टार्गेट, सोनाली बेंद्रेबद्दल केलं चुकीचं ट्विट
राम कदम सध्या प्रचंड चर्चेत अाहेत. ते का चर्चेत अाले हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. फेसबूक, व्हॉट्सअॅप, इन्स्टा, ट्विटर सगळीकडेच राम कदमांचे मीम व्हायरल झाले अाहेत. तसंच अापल्या एका वाक्याने तोंडघशी पडलेले राम कदम हे पुन्हा अडचणीत अाले अाहेत. या अडचणीमागचं कारणही तसंच अाहे. अमेरिकेत कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचं निधन झाल्याचं त्यांनी ट्विट केलंय. त्यांच्या या टि्वटमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट डिलिट केलंय.
मुलीचा लग्नाला नकार असेल तर अापल्याला फोन करा मी तिला पळवून अाणून तुमच्या स्वाधिन करेन असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अामदार राम कदमांवर चौफेर टिकेचा भडिमार सहन करावा लागतोय. मात्र ही टिका त्यांना जराही जिव्हारी लागलेली नाही, किंवा अापण काही मोठी चूक केली अाहे असंही त्यांना वाटत नसल्याचं त्यांच्या एकूणच वागण्या-बोलण्यावरून वाटत नाही. त्यातच त्यांच्या हातून अाज पुन्हा अाणखी एक चूक झाली. अभिनेत्री सोनाली बेंद्र यांचे निधन झाल्याचं त्यांनी ट्विट केलंं अाहे. बरं, या चुकीवरही पांघरूण घालण्यासाठी त्यांनी कारण शोधलं अाहे. सोशल मीडियावर सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे मॅसेज फिरत होते, त्यामुळे मी असं टि्वट केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाला असून ती अमेरिकेत यावर उपचार घेत अाहे. तिच्या प्रकृतीविषयी रोज नव-नवी माहिती समोर येत असल्यामुळे राम कदम यांच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली. तिचं खरंच निधन झालं अाहे का हे पाहण्यासाठी नेटिझन्सने इतर पर्यायही चेक केले. मात्र असं काहीच झालं नसल्याचं लक्षात अाल्यावर या नेटिझन्सने राम कदमांना पुन्हा एकदा टार्गेट केलं.

Comments
Post a Comment