ग्रामीण भाग आजही अंधश्रद्धेने बरबटलेला, वाचा काय घडले किल्ले रायगडच्या पायथ्याशी

महाड । किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावाजवळ बुधवारी सकाळी रस्त्यावर दिसलेल्या प्रकाराने सर्वांचेच काळीज थरथरले. रायगडवाडी निजामपूर रस्त्यावर एक बोकड बळी दिल्याचा प्रकार समोर आल्याने ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचे दिसून आले आहे. कांही महिन्यापूर्वी याच परिसरात वारंगी गावाच्या हद्दीत देखील एक खोदलेला खड्डा आणि शेजारी नारळ अबीर गुलाल टाकलेले आढळून आले होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावाजवळ स्मशानभूमी जवळ रायगडवाडी छत्री निजामपूर मार्गाला असलेल्या नाल्यात बुधवारी सकाळी एक बोकड मान उडवलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजारी एक साडी आणि अबीर गुलाल टाकण्यात आले होते. हा प्रकार गावात आलेल्या पोस्टमनला दिसून आल्यानंतर त्याने गावात कळवले. हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेतून बोकड बळी देण्यातला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. काही महिन्यापूर्वी किल्ले रायगडाच्या टकमकटोकाच्या पायथ्याशी वारंगी गावात देखील अशीच घटना समोर आली होती. याठिकाणी मात्र एक खड्डा खणून शेजारी नारळ आणि पिंजर असे साहित्य आढळून आले होते. वारंगी गावाच्या बरोबर पलीकडच्या बाजूला असलेल्या रायगडवाडी गावाजवळ अशीच घटना समोर आल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रायगडवाडी गावाच्या खालील बाजूला स्मशानभूमी आणि एक विहीर आहे. याच ठिकाणी असलेल्या रायगडवाडी निजामपूर रस्त्याच्या कडेला गटारात हा अंधश्रद्धेचा प्रकार केला आहे. याबाबत पोलीस पाटील गणेश डावले याने महाड तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
21 व्या महासत्तेची स्वप्न पाहणार्‍या या देशात ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा जिवंत असल्याने निष्पाप जनावरे, बालके बळी जात आहेत. घडल्या प्रकाराची चौकशी ग्रामस्थ देखील घेणार असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा