काहिलीपासून सुटका होणार? उद्या - परवा वादळी वाऱ्याची शक्यता

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा अधिक जाणवू लागला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळिशी पार गेले आहे. दरम्यान आता मे महिन्यात तरी या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल अशी सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा आशा आहे.

१० जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या 3 आणि परवा 4 मे रोजी विजांच्या कडकडाटासह व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस राज्यातल्या काही भागांमध्ये होऊ शकतो. तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून कळवण्यात आली आहे.

तर 3 मे 2022 रोजी पर्यंत विदर्भ मध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 2 मे रोजी चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून या भागाला भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा

अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार
३-४ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट शक्यता आहे तर एक ते दोन मे रोजी मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि पश्चिम राजस्थान व उष्णतेच्या लाटेची शक्‍यता आहेत. पाच मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पाच आणि सहा मे रोजी अग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रला लागून असलेल्या भागाला वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता असून त्यामुळे मच्छीमारांना या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा