नाकावरून रुमाल फिरवत अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल
मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीसुद्धा राज ठाकरेंनी नक्कल केली आहे. आता अजित पवार यांनीच राज ठाकरेंची नक्कल करुन टोला लगावला आहे. राज ठाकरेंसारखेच अजित पवारांनी नाकावरुन रुमाल फिरवत त्यांच्या सभेतील वाक्य म्हटलं आहे. औरंगाबादमधील सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नक्कल केली आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा जातीयवादाचा आरोप केला आहे. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट त्यांनी लावली आहे. शरद पवार जातीयवादी आहेत की नाही हे नाशिककरांना चांगले माहिती आहे. तसेच राजू शेट्टी, रामदास आठवले आणि यांनी सांगितले आहे की, शरद पवार जातीयवादी नाहीत. पवारांची राजकीय प्रवास तुमच्यासमोर आहे. एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्तव द्यायचे काय कारण असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.
Comments
Post a Comment