कोकण रेल्वेमध्ये चोरांचा धुमाकुळ,एक कोटी अठ्ठ्यांशी लाखांची सोन्याची बिस्किटे लंपास
महाड । कोकण रेल्वेमध्ये गoë¶m
काही वर्षांपासून प्रवाशांच्या सामान व दागिन्यांच्या चोऱ्या होण्याच्या घटनांमध्ये
वाढ झाली आहे. 23 सप्टेंबर रोजी मंगलोर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची सोन्याची बिस्किटे व रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. या बॅगेत 1 कोटी 83 लाख रूपयांचा ऐवज आणि 5 लाख रूपये रोख रक्कम
असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रात्रीचा प्रवास सध्या धोकादायक बनला आहे.
प्रवाशांचे दागिने लंपास करणे, बॅगा पळवणे, गुंगीचे औषध देऊन पैशांची लूट करणे, चेन स्नॅचींग असे प्रकार
यापूर्वी घडले आहेत. परंतू याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याने या
घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 23 सप्टेंबर रोजी मुंबई गोंवडी येथील सौरभ फत्तेलाल जैन हा मंगलोर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना माणगाव ते वीर दरम्यान फ्रेश होण्याकरता आपल्या आसनावरून
उठून गेले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने बॅगेवर डल्ला मारला. या
बॅगेमध्ये 10 ग्रॅम वजनाचे 60 सोन्याची बिस्कीटे आणि 5 लाख रूपयाची रोख रक्कम असा एकून 1 कोटी 88 लाख रूपयांचा ऐवज होता. बॅग लंपास झाल्याचे लक्षात येताच जैन
यांनी रत्नागीरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर तक्रार 27 सप्टेंबर रोजी महाड
तालुका पोलीस ठाण्यात तपासाकरीता दाखल वर्ग केली आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याच्या स्थानीक गुन्हे अन्वेशन विभाग पुढील तपास करीत आहे.
شركة تسليك مجارى ببيشة
ReplyDelete