कोकणात विसर्जन मिरवणुकीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
गुहागर । अनंत चतुर्थीच्या दिवशी कोकणात उत्साहाचे वातावरण असताना गुहागर येथे गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. गुहागर येथे विसर्जन मिरवणुकीत किरकोळ वादातून दोन सख्ख्या भावांना जीव गमावावा लागला आहे.
अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुहागर येथी झोंबडी गावात फटाके वाजवण्यावरून क्षुल्लक वाद निर्माण झाला. याच वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी लोखंडी सळ्या आणि रॉडने एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीमध्ये झोंबडी गावातील दोन तरुण मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही तरुण सख्खे भाऊ होते. महेंद्र गंगाराम सकपाळ आणि सुरेंद्र गंगाराम सकपाळ अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन सख्ख्या भावंडाची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून 15 जणांना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर झोंबडी गावात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने गावात एसआरपीची अतिरिक्त फोर्स तैनात केली आहे. या घटनेत गावच्या उपसरपंचसह अध्यक्षाचा समावेश आहे. दोन्ही गटातील वाद गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

CASINO HOTEL CASINO GULF-BILF,BILF - Mapyro
ReplyDeleteCASINO HOTEL CASINO GULF. Find 충주 출장안마 all information and 제주도 출장안마 best deals of CASINO HOTEL CASINO GULF. Realtime driving 춘천 출장샵 directions to CASINO 울산광역 출장샵 HOTEL CASINO GULF 동해 출장마사지