मुंबई गोवा महामार्गावर "या" वाहनांना बंदी

अलिबाग । गणेशोत्सव 13 ते 23 सप्टेंबर या दरम्यान साजरा होत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नाये म्हणून 8  ते 13 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुधपेट्रोलडीझेलस्वयंपाकाचे गॅस सिलिंडरलिक्किड मेडिकलऑक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहतुकीच्या वाहनांना बंदी लागू होणार नाही आहे.

सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते सप्टेंबर रोजी रात्री  8 वाजेपर्यंत अाणि 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (जडअवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलटेलर ) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णता: बंद राहणार आहे.
तसेच 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारची अवजड वाहने, 16टन किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. (जडअवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलटेलर) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णता: बंद राहील.
23 सप्टेंबर रोजी सकाळी 8  वाजेपासून ते 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारची अवजड वाहने, 16 टन किंवा 16 टनपेक्षा जास्त आहे. अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णता: बंद राहील.
14 ते 16 सप्टेंबर व 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टना पेक्षा जास्त आहे अशा सर्व वाहनांना सकाळी  8  ते रात्री 8  या वेळेत वाहतुकीस पूर्णत: बंदी राहील. अवजड वाहनांना रात्री  ते सकाळी 8  वाजेपर्यत वाहतूक करण्यास परवानगी राहील.
त्याचबरोबर 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून वाजेपासून ते 24 सप्टेंबर रोजी रात्री वाजेपर्यत मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाळूरेती व तत्सम गौणखनिजांची वाहतुकी करणा-या वाहनांना पूर्णता: बंदी राहणार आहे.




Comments

Popular posts from this blog

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा