उद्या डोंबिवलीत पाणी नाही
डोंबिवली । नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र येथील डोंबिवली पश्चिम विभागास पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे आउटलेटच्या व्हॉव्हमध्ये बिघाड झाल्याने सदर दुरुस्ती करण्याकरिता शनिवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेच्या नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र मधून महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पश्चिम विभागास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
सदर परिसरातील नागरिकांनी दिवसभरासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवत सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment